उमेश भातांब्रे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (गोविंद काळे) : उदगीर येथील अनंतपाळ मेडिकल स्टोअर्स चे मालक उमेश शिवमुर्तीप्पा भातांब्रे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये दि. 11 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता वयाच्या 46 व्या वर्षी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर दि. 12.10.2024 रोज शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी शिरूर अनंतपाळ येथील फार्म हाऊस मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार असून यशवंत विद्यालयाचे सेवानिवृत्त दांपत्य तथा योगशिक्षक शिवमूर्ती भातांब्रे,योग शिक्षिका कलावती भातांब्रे यांचे चिरंजीव, बालरोगतज्ञ डॉक्टर महेश भातांब्रे, डॉक्टर योगेश भातांब्रै यांचे बंधू होत.
त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.