डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाकडे मंत्र्यांनी फिरवली पाठ, बौद्ध समाजात नाराजीची लाट !! निवृत्ती सांगवे यांची तीव्र नाराजी !!

0
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाकडे मंत्र्यांनी फिरवली पाठ, बौद्ध समाजात नाराजीची लाट !! निवृत्ती सांगवे यांची तीव्र नाराजी !!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाकडे मंत्र्यांनी फिरवली पाठ, बौद्ध समाजात नाराजीची लाट !! निवृत्ती सांगवे यांची तीव्र नाराजी !!

उदगीर (प्रतिनिधी) : 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने उदगीर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार इंजी. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी उदगीर परिसरातील बौद्ध समाजाच्या भावनांची कदर करत उदगीर येथे बाबासाहेबांना मानवंदना देता यावी, यासाठी नागपूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची मिरवणूक काढत शहरांमध्ये विश्वशांती बौद्ध विहार येथे मानवंदनेचा कार्यक्रम ठेवला होता. कर्म धर्म संयोगाने याप्रसंगी बौद्धविहार येथे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे देखील उपस्थित होते, मात्र त्यांनी ही मिरवणूक बुद्ध विहारा जवळ येताच तेथून काढता पाय घेतला आणि अस्थिकलशाचे दर्शनही घेतले नाही. याबद्दल बौद्ध समाजामध्ये प्रचंड नाराजीची लाट पसरल्याची चर्चा चालू आहे. याबद्दल राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय दलित पॅंथर चे प्रदेश उपाध्यक्ष तथा उदगीर नगरपालिकेचे माजी सभापती निवृत्तीराव सांगवे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उदगीर शहरांमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्याने उभारण्यात येत असल्याने त्या ठिकाणी जुना पुतळा होता, तो काढण्यात आला आहे, आणि आता त्या जागेवर काहीही नसल्यामुळे उदगीर परिसरातील नागरिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मानवंदना कुठे द्यावी? अशा विवंचनेत असतानाच काही भीमसैनिकांनी या संदर्भात इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्यासोबत चर्चा करून अस्थिकलश आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या लोक भावनेची कदर करत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थी कलश उदगीर मध्ये आणला. यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे नागरिकांना अस्थिकलशाचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत आली. उदगीर शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकापासून अस्थिकलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जगभरातील भिकू संघाचे नामांकित अध्यक्ष यामध्ये श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम, जापान, कंबोडिया, थायलंड, भारत या ठिकाणच्या भंतेजिंनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले होते.
सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत अस्थिकलशाची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन केले, त्यानंतर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर साडेबारा वाजता विश्वशांती बौद्ध विहार येथे देशभरातून आलेल्या भिकू संघाचे भोजनदानचा कार्यक्रम झाला. त्यानंतर देश विदेशातील भिकू संघाचे स्वागत व धम्मदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. एका बाजूला बौद्ध समाजामध्ये आणि भीमसैनिकांमध्ये या कार्यक्रमामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या भागाचे प्रतिनिधी असताना देखील आणि बौद्ध विहारात उपस्थित असताना देखील अस्थिकलशाचे दर्शन घेण्याचे मंत्रिमहोदयांनी टाळल्याबद्दल भीमसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट पसरली आहे. वास्तविक पाहता आयोजक कोणीही असला तरीही जगभर ज्या महामानवाला मानवंदना दिली जात होती, त्या महामानवाच्या अस्थिकलशाकडे पाठ फीरवणे कितपत योग्य आहे? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
प्रचंड जनसमुदायाला जगभरातील भंतेजींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिकू संघाच्या वतीने बौद्ध उपासक, उपासिका यांना बौद्ध धम्माचे तत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या मानवी जीवनामध्ये सुख समृद्धी आणू शकतात. बौद्ध धम्म हा शांतीचे प्रतीक आहे. जगाला आता युद्ध नको बुद्ध हवा, हा संदेश आवडू लागला आहे. अशा अर्थाचे मार्गदर्शन केले. बौद्ध धम्माच्या आचरण केल्यास जीवनामध्ये शांती प्राप्त होऊ शकते, असे सांगितले. इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन च्या वतीने भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उदगीर, जळकोट, देवनी, चाकूर, अहमदपूर परिसरातील जनतेकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच अस्थी कलशामुळे यावर्षी परिसरातील जनतेला विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देता आली. अशा पद्धतीच्या भावना नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *