धोडीहिप्परगा व समातानगर येथे मनसे शाखेची स्थापना
उदगीर (प्रतिनिधी) : आगामी विधानसेभेच्या दृष्टीने उदगीर विधानसभेतील पदाधिकारी संघटनात्मक बांधणीच्या कामी सातत्याने सक्रीय असुन गाव तेथे शाखा अभियानांतर्गत तालुक्यातील बहुतांश गावी शाखा स्थापनेचे लक्ष पुर्ण करण्यासाठी गावोगावी शाखा काढण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने धोंडीहिप्परगा व समातानगर उदगीर येथे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष संतोष भोपळे, तालुका सचिव सुनिल तोंडचिरकर,उपाध्यक्ष गुरुदत्त घोणसे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे,शहर सचिव लखन पुरी,शहर उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील,रामेश्वर बनशेळकीकर, केदार पुराणिक, विद्यार्थी सेना शहर सचिव रोहीत बोईनवाड,शरद चिखले आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी धोंडिहिप्परगा शाखाध्यक्ष परमेश्वर बापटले व समतानगर शाखाध्यक्ष अभिषेक सुर्यवंशी यांच्यासह शाखेची कार्यकारणी घोषीत करण्यात आहे.