शालेय बॅडमिंटन स्पर्धेत समर्थ विद्यालयाचा संघ राज्यस्तरावर
उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विभागीय स्पर्धेत प्रथम आला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
समर्थ विद्यालयाच्या संघाने लातूर शहरी संघास सरळ सेटमध्ये पराभूत करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लातूर विभागातून पात्र ठरला. याबद्दल खेळाडू मृणाल पोतदार, श्रुती रणदिवे, दिव्यांका भोसले, रूपाली वाडकर, ज्ञानेश्वरी गोदाजी यांचा संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.