माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरातील शादीखाना इमारतीचे लोकार्पण
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील लातूर शहर महानगरपालिकेच्या शादीखाना इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश जिथलिया, लातूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, चांदपाशा इनामदार, माजी महापौर कैलास कांबळे, अहमदखा पठाण, सत्तार शेख, आसिफ बागवान, प्राध्यापक प्रवीण कांबळे, इमरान सय्यद, विजयकुमार साबदे, युनूस मोमीन, सचिन बंडापले, आयुब मणियार, गिरीश ब्याळे, शफी शेख, सिकंदर पटेल एडवोकेट देविदास बोरुळे पाटील, अविनाश बटेवार, कलीम शेख, तबरेज तांबोळी, रईस टाके, फैसलखान कायमखानी, प्रवीण सूर्यवंशी, राम स्वामी, गौस गोलंदाज, युनुस शेख, भाऊसाहेब भडीकर, शाहरुख पठाण आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहर महानगरपालिकेचा शहरात शादीखाना आजपासून सुरू होत आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे, पण महाराष्ट्रात व लातूरात काही घटना अशा घडत आहेत त्यामुळे अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या मनात भीती निर्माण होत आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचा काल मुंबईमध्ये खून झाला सिद्दिकी हे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते बाबा सिद्दिकी यांना महाराष्ट्र सरकारची वाय सुरक्षा होती तरीही घटना घडली. यामुळे महाराष्ट्र सरकारचा कारभार व्यवस्थित नाही हे लक्षात येते सिद्दिकी यांच्यासारखा माणूस सुरक्षित नसेल तर तर सामान्य माणसाचे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व सुरक्षित असले पाहिजेत हा साधी शादीखाना लवकरात लवकरच उभा राहील यासाठी
आपण सर्वांनी प्रयत्न केले. आपण हे काम करतोय हे पाहून विरोधकांनीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण तो त्यांचा अपूर्ण शादीखाना आपण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पूर्ण करू. अल्पसंख्याक समाजाचे सर्व प्रश्न सोडवू अल्पसंख्याक समाजाचे उमेदवार येथे मेरीटमध्ये सरस आहेत
त्यांना विधानसभेला तिकीट दिले जाईल काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज बांधवांच्या विविध मागण्यांचा समावेश केला जाईल असे
यावेळी बोलताना सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे,फारुक शेख सत्तार शेख मूवीज शेख यांनी मनोगत व्यक्त केले.