सिध्दी शुगर व धन्वंतरी आर्युवेदीक मेडिकल कॉलेज, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व औषधी उपचार शिबीर संपन्न
अहमदपुर (गोविंद काळे) : १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दु.४.०० या दरम्यान सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, येथे धन्वंतरी आर्युवेदीक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पीटल, उदगीर व सिध्दी शुगर यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकरी, परिसरातील नागरिक, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांची मोफत सर्वरोगनिदान व औषधी उपचार तथा निशुल्क रक्तशर्करा (ब्लडशुगर) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते.
सदर कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन माजीमंत्री श्री. बाळासाहेबजी जाधवसाहेब , डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. नेहा पाटील, व्हाईस प्रेसिडेंट श्री.पी.जी. होनराव, प्राचार्य डॉ. दत्तात्रय व्ही.पाटील जनरल मैनेजर (केन) श्री.पी.एल. मिटकर, यांचे हस्ते करण्यात आले.
सदर शिबीरासाठी धन्वंतरी आर्युवेदिक मेडिकल कालेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय व्ही. पाटील. डॉ.ऋषिकेश पाटील, डॉ. नेहा पाटील, डॉ. आयुब पठाण, डॉ. अतुल खडके, डॉ. मंगेश मुंढे, डॉ.उषा काळे, डॉ. अमोल पटणे, डॉ. सचिन टाले, डॉ. योगेश सुरनर, डॉ. मलीकार्जुन बिरादार, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. गुरुराज वरनाळे, डॉ. शिवकुमार मरतुळे, डॉ. नमृता कोरे, डॉ. प्रवीण बलुतकर, डॉ. शिवकांता चेटलूरे, डॉ. प्रमोद जमादार, डॉ. श्रृती तिवारी व आंर्तरवासीयता प्रशिक्षणार्थी नर्सिंग स्टाफ, शिक्षकेतर व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सदरील शिबीरामध्ये वातविकार, आम्लपित्त, मणक्याचे आजार, कान-नाक-घसाचे आजार, हदयरोग, मधुमेह, त्वचाविकार, लठ्ठपणा, नेत्ररोग, दंतरोग, श्वसनविकार, पोटातील विकार, लहान बालकांचे आजार, श्वेतप्रदर, रक्तप्रदर, स्त्रियांचे विकार (गासीकपाळी) सर्व गर्भशयाचे आजार, मानसीक आजार, कर्करोग, अस्थीरोग, यकृताचे विकार, वंध्यत्व व लैंगीक समस्या इत्यादी अजारांचा रुग्णावर आवश्यकतेनुसार तपासण्या करण्यात आल्या, व गरजेनुसार नेत्र तपासणी करुन मोफत चष्मे वाटप करण्यात आले. महिलांचे कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, निशुल्क (मोफत) केले जाईल तसेच प्रसुती (बाळांतपण) व गर्भाशया संबधित विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडीक्स समस्या, हार्नीया हायड्रोसिल, मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प (५० टक्के) सवलत दरात धन्वंतरी आर्युवेदिक मेडिकल कॉलेज श्रीकृष्ण मंदिरा समोर देगलुर रोड, ऊदगीर येथे केली जाणार आहे. तसेच ई.सी.जी. तपासणीचीही व्यवस्था करण्यात आलेली होती, मोतीबिंदु आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्पदरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुध्दा करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) श्री. पी.एल. मिटकर, परचेस ऑफिसर श्री. धनराज चव्हाण, ई.डी.पी. मॅनेजर श्री. प्रशांत जाधव, गोडावून किपर श्री. अरविंद कदम, सुरक्षा अधिकारी श्री.व्ही.एच. डोंगरे, हेड टाईम किपर श्री.धनंजय टिळक, गार्डन सुपरवायझर श्री. हरिभाऊ पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमासाठी भागातील शेतकरी, व तसेच कारखाना शेजारील उजना, वडारवाडी, सांगवी, सुनेगांव, सांगवी तांडा, राळगा, राळगा तांडा, बेंबडेवाडी, गंगाहिप्परगा, तुळशिराम तांडा, पेमातांडा, रामपुरतांडा, थावरा तांडा, रुई या सर्व गावातील ९५७ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहुन त्या त्या आजारांची मोफत तपासणी करुन घेतली व त्यांना उपचारासाठी गोळया औषधे मोफत देण्यात आल्या.
सदर मोफत सर्वरोग निदान शिबीर व औषधोपचार तथा निशुल्क रक्तशर्करा (ब्लडशुगर) तपासणी शिबीर आयोजित केल्याबददल कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. पी.जी. होनराव यांनी धन्वंतरी मेडिकल कॉलेजच्या सर्व स्टाफचे व बाहेरुन शिबीरासाठी विशेष करुन आलेल्या तज्ञ डॉक्टरांचे आभार मानले.