श्यामलाल हायस्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक हात धुवा दिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक भारत खंदारे, पर्यवेक्षक राहुल लिमये, ज्येष्ठ शिक्षक संजय देबडवार यांनी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य सर्व भारतीयांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे, अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून जगभरामध्ये भारत देशाचा मान वाढवणारे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, अवकाश प्रक्षेपण व संशोधन या कार्यामध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भरीव कार्य केलेले आहे. अंतराळातील सर्व मोहिमा भारताच्या यशस्वी झाले आहेत, भारत देशाचे 11 वे राष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करणारे अब्दुल कलाम हे थोर व्यक्तिमत्व होते . त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण सर्वांनी घेऊन कार्य करावे असा संदेश संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी दिला.
जागतिक हात धुवा दिन या निमित्ताने सुद्धा हात धुण्यासंदर्भात, स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . हात धुण्याचे प्रात्यक्षिक गीताच्या माध्यमातून करून दाखवण्यात आले.