खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठपुराव्याला यश
दिवाळी सणात लातूर – पुणे, पुणे – लातूर इंटरसिटी रेल्वे प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार
लातूर (एल.पी.उगीले) : लातूरचे नूतन खासदार शिवाजी काळगे यांच्या सततच्या पाठपुराला यश आले असून आठवड्यातील चार दिवस लातूर- पुणे, पुणे – लातूर दरम्यान आता इंटरसिटी रेल्वे धावणार आहे.
लातूर – पुणे दरम्यान सकाळच्या वेळेत रेल्वे सुरू व्हावी अशी लातूरकरांची अनेक दिवसापासूनची मागणी होती, लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनीही मागच्या काही महिन्यापासून ही मागणी लावून धरली होती. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी नुकतीच रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री मीना यांची मुंबई येथे भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागाच्या मागण्यासंदर्भात निवेदन दिले होते, यावेळी त्यांनी लातूर येथे सकाळी सहा पासून रात्री साडे दहा पर्यंत लातूर- मुंबई रेल्वे थांबून असते, ती रेल्वे लातूर पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे म्हणून चालवल्यास लातूरकरांची मोठी सोय होईल, शिवाय रेल्वेलाही त्याचा फायदा होईल हे पटवून दिले, त्यांच्या या शिष्टाईनंतर, रेल्वे विभागाने दिवाळी सणाच्या दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर, आठवड्यातील सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे चार दिवस लातूर – पुणे आणि पुणे – लातूर अशी इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे, २५, २८, २९, ३०, ऑक्टोबर व १,४,५, ६, ८, ११ नोव्हेंबर अशी दिवाळीच्या सणात दहा दिवस प्रायोगिक तत्वावर ही गाडी लातूर पुणे दरम्यान धावणार आहे, पुणे येथील हडपसर स्टेशन पर्यंत , लातूर येथून सकाळी ९ ३० वाजता ही गाडी पुण्याकडे निघेल, हडपसर स्टेशन वरून ही गाडी ३.३० वाजता लातूरकडे निघेल, लातूर येथे ९.४० वाजता पोचल्यानंतर १०.३० वाजता पुन्हा ती रेल्वे मुंबईला रवाना होईल, असे रेल्वेचे परिपत्रकात म्हटले आहे,
लातूर येथून उत्तर भारतात तसे दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, बिदर पर्यंत येणारी मच्छीपटलम या गाडीचा लातूरपर्यंत विस्तार करावा, लातूर मुंबई गाडीला मुरुड येथे थांबा द्यावा, लातूर स्टेशनवर क्रॉसिंग ट्रॅक उभारण्यात यावा, स्वतंत्र बिदर मुंबई गाडी सुरू करावी आदि मागण्याह खासदार डॉ.८ शिवाजी काळगे यांनी केल्या असून त्या सर्व मागण्याही विचाराधीन असल्याचे रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक श्री मीना यांनी डॉ. कोळगे यांना सांगितले आहे.