राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी किलबिलच्या दोन संघाची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 13/10/2024 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 14,17,19 वयोगटातील मुले व मुली अशा एकूण 23 संघांचा समावेश होता. यात किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 14 व 19 वर्षे वयोगट मुले या दोन्ही संघाने आपली चमकदार कामगिरी केली. सदरील दोन्ही संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली . 14 वर्षे वयोगटातील संघामध्ये श्रीरामे कृष्णा, जाजू अमर, सूर्यवंशी व्यंकटेश, जाधव परमेश्वर, जगताप प्रणव, भुरे यश, काजी फहाद, धसवाडीकर राजवीर, पदमपल्ले अखिल या खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश होता तर 19 वर्ष वयोगटाखालील संघामध्ये अनुक्रमे सूर्यवंशी ऋषिकेश, हत्ते सुशांत, मुळे सिद्धेश्वर, सूर्यवंशी पवन, सय्यद अलीयान, देशमुख हर्षवर्धन, खोमणे प्रथमेश, शिंदे कल्पेश, मोघेकर संस्कार या खेळाडूंचा समावेश होता. त्याचबरोबर 17 वर्ष वयोगटामध्ये सृष्टी गुट्टे, अपेक्षा बिरादार, श्रद्धा होनराव, कार्तिक गुट्टे या चार विद्यार्थ्यांची निवड चाचणी मार्फत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षक अर्शद शेख, कासिम शेख, विशाल सरवदे, निलेश बन यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धरमसिंग शिराळे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप, राजकुमार कदम यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या..!!