शिवाजी महाविद्यालयात डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयात डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ.मांजरे म्हणाले ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य खूप महान आहे.त्यांनी अग्नी, पृथ्वी, त्रिशूल सारखे क्षेपणास्त्र निर्माण करून त्यांनी भारताचे नाव अजारामर केले. भारतीय राजकारणात राष्ट्रपती म्हणून काम केलेले संपूर्ण देशाला आदर्श ठरले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्ही.आर.भोसले, प्रबंधक बी. के. पाटील, अधीक्षक व्ही.डी.गुरनाळे, मुख्य लिपिक आर.एम. लाडके, डॉ.विजय जाधव,डॉ.डी. बी.कोनाळे,प्रा.आर.बी.
एडतकर, डॉ.ए.एस. टेकाळे ,प्रा.मटके प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समिती प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ .डी. बी. मुळे यांनी मानले.