लातूरचा भूमिपुत्र चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत अमूर्त चित्रांचे प्रदर्शन

0
लातूरचा भूमिपुत्र चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत अमूर्त चित्रांचे प्रदर्शन

लातूरचा भूमिपुत्र चित्रकार अभिजीत लामतुरे यांचे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत अमूर्त चित्रांचे प्रदर्शन

अहमदपूर (गोविंद काळे) : शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोकळगाव चे भूमिपुत्र तथा प्रख्यात नव चित्रकार अभिजीत बी लामतुरे या नवख्या चित्रकाराचे अमूर्त चित्रांचे प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी एम जी रोड मुंबई येथे दिनांक 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
       अभिजीत लामतुरे यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका लातूरच्या शाळेत, माध्यमिक शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीदेशिकेंद्र विद्यालयात तर चित्रकलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय लातूर, भारती विद्यापीठ पुणे, अभिनव कला महाविद्यालय पुणे आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे झाले.
      ज्याला अस्तित्व नाही.( याची कल्पना करून कॅनव्हास वर चित्रात मांडणे म्हणजे अमूर्त कला) व्याख्या करता येते.
      साधारणतः स्ट्रोक, शेप, संरचना, रंगफार्म, उद्देशाने आणि समज भिन्न असल्याने त्या चित्रामध्ये दिसणारे अर्थ असंख्य असतात.
     मानवी बुद्धीला ज्ञात असलेल्या सर्व आकारांना काहींना काही संज्ञा आहेत.
      ब्रह्मांडाच्या अवकाशात असंख्य आकार दृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत. त्याची उत्पत्ती एका बिंदूपासून अनेक बिंदू एकत्र येऊन झालेले आहे. याला संज्ञा नाही. म्हणून अमूर्त आहेत.
     बिंदूपासून जन्माला येणारा महाप्रचंड तारा तुटतो. तेव्हा प्रचंड ऊर्जा उत्सर्जित करतो. तेव्हा त्याचा कृष्ण विवर तयार होतो. हे कृष्णविवर म्हणजे भला मोठा बिंदू उत्पन्न झालेला अमूर्त आकार होय.
     चित्रकार अभिजीत लामतुरे यांनी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेल्या सौंदर्य सृष्टीतल्या सर्व ज्ञात व अज्ञात आकाराच्या उत्पत्ती मागील मूळ गाभा असलेल्या बिंदूत्वाचा शोध चित्र मध्ये बिंदू रेषा आकार रंग पोत या पाच तत्वा पासून नवनवीन प्रतिमा निर्माण केलेल्या आहेत.
     त्यात वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते, अकबर पदमसी या चित्रकाराचे आहे.
      त्यांचा वसा घेऊन हा नवखा चित्रकार आपले चित्र  प्रदर्शन सादर करीत आहे.
     अभिजीत लामतुरे आणि त्यांची निरव वय कला.
      साधारणपणे 1917 नंतर म्हणजे युरोपातील स्टीजल मुव्हमेंट पासून पुढील काळाला अप्रतिरूपवादी कला(Non -Representation art= नॉन रिप्रेझेंटल आर्ट) मानन्यात येतें.
       अनेक जहरी टीका, शोषित ही चळवळ नुसती टिकून राहिली नाही तर जगमान्य झाली.
     भारतीय तत्त्वज्ञानाला  पूर्वीपासून अशा अमूर्त, निराकार,निरवयव  दार्शनिक तत्त्वज्ञांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे हा पाश्चात्य कला विचार भारतीय कला परंपरेत स्वीकारली जाताना त्यात केवळ संगीतातून घेतलेल्या प्रेरणा नाहीत. तर त्या जोडीला अध्यात्माची जोड दिलेली जाणवते.
    अशा भूमिकेतून महाराष्ट्रातील जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये नवनवीन प्रयोग झाले. रंग माध्यमावरील असामान्य पकड आणि ठाम भूमिका घेऊन आपल्या कलाकृतींना श्रेष्ठत्व दर्जा प्राप्त करून देणाऱ्यात वासुदेव गायतोंडे, अकबर पदमसी, प्रभाकर कोलते यासारखे आग्रणी आहेत.
    हीच परंपरा आपल्या खास शैलीत लातूरचे भूमिपुत्र तथा अभिजात कलाकार अभिजीत बी लामतुरी यांनी पुढे चालवलेली दिसते.
      खरंतर अभिजीत हा मराठवाड्यातील ग्रामीण भागातून आलेला नवतरून लातूर जिल्ह्यातील कोकळगाव तालुका निलंगा येथील रहिवासी कलेच्या ध्यासाने मुंबई आलेला.
      मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर विविध विचारांची ऊर्जा केंद्र बनले.
    ते महाराष्ट्राला लीड करणाऱ्या स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माननीय माजी राष्ट्रपती शिवराज पाटील चाकूरकर यांच्यापर्यंत तीच ऊर्जा मुंबई स्थिरावलेल्या लातूरच्या कलावंतांमध्ये जाणवते.
     अभिजीत लामतुरे हा अशा कलावंताचे प्रतिनिधी करतो.                        ग्रामीण जीवनातील साचेपणा, भावविभोरता, जिव्हाळा निसर्गातील गढूळ अशा काही गोष्टी त्याच्या ठाई वसणाऱ्या ऊर्जा केंद्रभोवती ठान मांडून आहेत.
     आरंभीच्या दृश्य जीवनाच्या अनेक प्रयोगातून ज्याला त्याची स्वतःची अभिवाट सापडलेली दिसते .
     त्याचे फलित  जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथील कलादालनात पहावयास मिळते.
       ग्रामीण जीवनातील साधेपणा भावविभोरता जिव्हाळा निसर्गाशी असलेले अतूट नाते या बाबीच अभिजित लामतुरे यांच्या चित्रातील गुड गंमःय अशी सुचिभूर्त सौंदर्यशी आहे.
     हृदयातून दृश्यपर्यंतचा कलावंताने केलेला सौंदर्यपूर्ण प्रवास कलेच्या विशुद्धतेची प्रचिती देतो.
     अमूर्त कलेकरिता कलावंताची अशीच वृत्ती पोषक ठरत असते. अमूर्त कलेत गुड परंतु गम्य आनाकनीय परंतु सुखद, अबोध परंतु अभिभूत असे अनुभव घेता येत असतात.
      अशा कलेत कथन नसतं त्यामुळे अमूर्तकलेत अर्थ शोधायचा प्रयत्न करावयाचा नसतो ती. कला अनुभवायची असते. अभिजित ची चित्रे अशास प्रकृती ची चित्रे  आहेत.
      अभिजीतच्या चित्रात सफाट पृष्ठभागावर सुटसुटीत आकाराची रचना आणि रंगाची शिलाईदार पारदर्शक क्रांती अध्वत असते.
     आकार आणि अवकाश यांचा संबंध केवळ रचनेपुरता मर्यादित न राहता. त्यांच्यातील एकमेकातील गुंतवणूक गुंतागुंत नाट्यमय रीतीने असते.
      रंगाना त्याच्या स्वतःचा अंगीभुत सौंदर्य लाभलेल असतं ते सौंदर्य आबादी ठेवून त्या सत्व अधिकाधिक खुलून अभिजीत यांना छान जमतं किंवा त्याच्या निर्मिती प्रक्रियेचा तो महत्त्वाचा हिस्सा आहे असे म्हणता येईल.
      विविध रंगाचे अनेक पातळ पारदर्शक थरावर थर अंतरत अभिजीतची चित्र आकार घेऊ लागत.
      या थरांची एकमेकातील गुंतागुंत म्हणजे तलम रेशमी आच्छादने भारावलेले सांस्कृतिक वंगण होय. अनेक रंगाच्या पातक पातळ रेशमी तान्या पाण्यातील आकाराची गुंतवणूक अभिजातच्या चित्राचे मूल्य वाढवतात.
     भारतीय आध्यात्मिक व दर्शनी परंपरांना अमूर्तवादी विचार नवीन नाही.
      त्यामुळे भारतीय मन अमूर्त कलाविष्कारातून केवळ सौंदर्य शोध नव्हे तर परमानंद मिळवते. जे जे स्कूल ऑफ आर्टने अमूर्त चित्रकलेत नवनवीन प्रतिमा निर्माण केल्या आहेत.
      त्यात वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते, अकबर पदमसी, या  श्रंखलेत पुढील आश्वासक नाव अभिजीत बी  लांमतूरे यांच्या आहे असे मला वाटते.
        आमच्या या मातीतील कलाकाराला सबंध लातूरकरांच्या वतीने मानाचा मुजरा त्यांच्या चित्रकलेला उदंड प्रतिसाद मिळो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
  
राम तत्तापुरे,
अहमदपूर जिल्हा लातूर
(9764330300)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *