संत ज्ञानेश्वर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या
सचिव प्राचार्या रेखाताई तरडे-हाके, प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका योगेश्वरी फपागिरे व बालाजी सुडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवराज फपागिरे, बालाजी फुलमंटे, मुख्याध्यापिका आशा रोडगे ,मुख्याध्यापिका मीना तोवर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदर्श शिक्षक तथा प्रमुख मार्गदर्शक बालाजी सुडे यांनी आपल्या उत्कृष्ट कथाकथन शैलीतून वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
यावेळी शाहू भूषण पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती योगेश्वरी फपागिरे -सुडे यांचा विद्यालयाच्या
वतीने प्राचार्या रेखाताई हाके-तरडे यांच्या हस्ते मानाचा फेटा, साडी, शाल ,पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी त्यांनी सत्काराला उत्तर देताना शाळेत घेत असलेले विविध उपक्रम ,विद्यार्थी शिस्त, विद्यार्थी प्रगती बाबत प्रशंसा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवराज फपागिरे यांनी मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळाला यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप रेखाताई तरडे यांनी केला.
प्रास्ताविक आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन मीना होनराव यांनी तर आभार शबाना शेख यांनी मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.