विविध उपक्रमातून ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहाने साजरा
यशवंत विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमातून डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.जगाने प्रेरणा घ्यावी असे
प्रसिद्ध वैज्ञानिक,मिसाईल मॅन , प्रखर देशभक्त, उत्तम वक्ता , मुलांमध्ये मिसळणारे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व लाभलेले डॉ.ए.पी.जे.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन ही जयंती विविध उपक्रमातून यशवंत विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली.
शालेय प्रांगणात वाचन कट्टा, रिंगणात बसून वाचन,चौरसाकृती,आयताकृती व सरळ रेषेत बसून वाचन तसेच इंग्रजी यशवंत (YESHWANT)शब्द साखळीच्या आकारात बसून विद्यार्थ्यांने भाषा विषयाचे शालेय पुस्तकाचे वाचन केले.
शाळेचे उपमुख्याध्यापक माधव वाघमारे यांनी डाँ कलाम साहेबांच्या जन्म व जीवन कार्याचा इतिहास त्यांना लाभलेले गुरुजन वर्ग तसेच त्यांना मिळालेले भारतातील सर्वोच्च पद्मभूषण,पद्मविभूषण व भारतरत्न पुरस्कार मिळणारे थोर शास्त्रज्ञ तसेच विज्ञान विषयातील योगदान कौतुकास्पद आहे.याबाबत मनोगतातून विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने
विद्यालयासाठी २१ ग्रंथ भेट स्वरुपात देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक प्रमुख राजकुमार पाटील,डाँ शरद करकनाळे,राजकुमार बोराळकर,गहनीनाथ क्षिरसागर,गुरप्पा बावगे,दिपक हेंगणे,अवधुत बुरुजपट्टे,कलाध्यापक महादेव खळुरे,एनसीसी आँफिसर गौरव चवंडा,आदिनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्तविक राजकुमार पाटील तर आभार प्रविण मोरे यांनी मानले.
मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी डाँ ए.पी.जे.कलाम साहेबांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.