डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय व हक्क मिळाले – मा.आ. बब्रुवान खंदाडे
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत ६८ वा धम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील ध्वजारोहण माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधव जाधव यांनी दीप प्रज्लवीत करून उद्घघाटन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उद्घघाटक पर भाषणात माधव जाधव म्हणाले की मी संविधानामुळेच मोठा झालो आहे मला विविध प्रकारची पदे मिळालेली आहेत व संविधानामुळेच मला प्रत्येक कामात यश मिळाले आहे आणि प्रत्येक जातीतल्या लोकांना सुद्धा याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढे चालून याचा लाभ असाच मला मिळेल आणि आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे ज्यामुळे लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर किती उंचीचे होते त्यांच्यासारखा विद्वान माणूस या जगात होणार नाही आणि झाला नाही असे आपल्या उद्घघाटक पर भाषणात माजी जि. प. सदस्य माधव जाधव म्हणाले.
यानंतर माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे आपल्या भाषणात म्हणाले की तथागत गौतम बुद्धाच्या नंतर या पृथ्वीतलावरी तेजस्वी सुर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते आणि रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप वर्षे अभ्यास करून त्यांनी येवला येथे मी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अशा महामानवाची कार्य आपण कदापि विसरू शकत नाही. आणि डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय व हक्क मिळाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे पाच लक्ष लोकांसमोर हा बुद्ध धम्म समाजाच्या लोकांना दिला. म्हणून आपण सर्वांनी बौद्ध धम्माचे आचरण करावे असे पुतळ्यासमोर दि.14 -10 – 2024 रोजी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या अभिवादन सभेमध्ये आपल्या भाषणात माजी आमदार बब्रुवान खंदाडे म्हणाले.
प्रास्ताविक पर भाषणात सौ अंजलीताई अरुण वाघंबर म्हणाल्या की बुद्ध धम्म ही घर वापसी है.. ! क्योंकी यह भारत भूमी प्राचीन काल से बुद्ध की है..! बुद्ध धम्म ही प्राचीन धर्म है आज लाखो करोडो लोग बुद्ध धम्म का आचरण कर रहे है..! और अपना जीवन मंगलमय कर रहे है..!
बुद्ध धम्म हा शांतीचा धम्म आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे. या धम्मामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही. असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सौ.अंजली अरुण वाघंबर या म्हणाल्या.
यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपीनाथ जोंधळे, श्रीकांत बनसोडे, इमरोज पटवेकर, सरस्वती कांबळे, श्रीरंग गायकवाड, श्याम देवकते, इत्यादी मान्यवरांनी महापुरुषांच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या कार्यावर आपल्या भाषणातून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे पंचशील ध्वजारोहण माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे हे होते.तर, उद्घघाटक म्हणून माजी जि.प. सदस्य माधव जाधव हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, श्रीकांत बनसोडे,सौ. अंजली वाघंबर, दैवशाला वाघंबर,
रसिका बनसोडे,शकुंतला बाई बनसोडे, प्रतीक्षा ससाने, महानंदा दाभाडे, श्याम देवकते, इमरोज पटवेकर, सरस्वतीबाई कांबळे, डॉ. संजय वाघम्बर, गायकवाड सर, अण्णाराव सूर्यवंशी, जीवन गायकवाड, यशोधरा महिला मंडळ सैनिक कॉलनी अहमदपूर , तसेच रमाई महिला मंडळ अहमदपूर, बाबासाहेब वाघमारे, प्रकाश फुलारी, अभय मिरकले, पत्रकार भीमराव कांबळे, शेटीबा शृंगारे, त्रिशरण वाघमारे, जीवन गायकवाड, वाल्मीक कांबळे, देविदास ससाणे,विठ्ठल गायकवाड, सौ. अंधोरीकर ताई, जयश्री ताई गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्रिशरण पंचशील सौ.अंजली वाघंबर, यांनी घेतले.
तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
हा ६८ वा धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, कलीम अहमद, आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड, रितेश वाघम्बर, केतन लामतुरे,झैद पठाण, आकाश व्यवहारे, श्रीरंग गायकवाड, लक्ष्मण बनसोडे,नामपल्ले,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार श्रीरंग गायकवाड यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आणि शाहीर सोनबा शिरसाट अँड संच यांचा भीम बुद्ध गीतांचा दणदणीत असा कार्यक्रम दिवसभर झाला.