मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ नरसिंग कदम यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ नरसिंग कदम यांची नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या आधीन असलेला महत्वाचा प्रकल्प आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी मराठी विश्वकोश कार्यरत आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकांवरून नुकतेच निवड झाल्याचे त्यांना कळवले आहे.
प्रा. डॉ. नरसिंग कदम हे शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे गेल्या वीस वर्षापासून मराठी विभागात कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे, काकासाहेब पाटील, भिमराव पाटील, पृथ्वीराज पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम नवले, उपप्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, बालाजी पाटील यांनी अभिनंदन केले.