लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाची सवय व्हावी ,म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न, मिसाइल मॅन डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे तसेच विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.वाचनाचे फायदे सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी विद्यार्थ्यांनी आजच्या वाचन प्रेरणा दिनादिवशी नियमितपणे दररोज वाचनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
सर्व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून घेतले.सुत्रसंचलन सौ.देवकबाई काळे यांनी केले.