जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोसायटी चेअरमन यांना मोबाईल सेट भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करत असलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन यांना मोबाईल सेट भेट देण्यात आला. याची सुरुवात उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर व जळकोट तालुक्यातून करण्यात आली आहे. मोबाईल सेट भेट देत असताना काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, जळकोट येथील काँग्रेस पक्षाचे मनमथ आप्पा किडे यांच्यासह तालुक्यातील चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या बरीच कामे ऑनलाईन पद्धतीने करावी लागत असल्यामुळे चेअरमन संघटनेच्या वतीने काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा जिल्हा बँकेचे चेअरमन आ. धीरज देशमुख यांच्याकडे काही चेअरमननी मागणी केली होती. ती मागणी मान्य करत प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करण्यात आली आहे.