श्यामलाल विद्यालय येथील एनसीसी विद्यार्थ्यांचा गौरव
उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोर च्या विद्यार्थ्यांनी उमरगा येथे संपन्न झालेल्या सी ए टी सी कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याबद्दल मुख्याध्यापक भारत खंदारे यांनी एनसीसीचे प्रशिक्षक बालाजी सोनाळे आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही याप्रसंगी शाळेच्या वतीने करण्यात आला.