राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका कार्याध्यक्षपदी प्रीती कवटीकवार
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा प्रीती कवटीकवार यांची उदगीर तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर जिल्हा कार्याध्यक्षा दिपाली औटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानी, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष शफी हाशमी यांची उपस्थिती होती. सदर निवडीबद्दल आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, प्रदेश सरचिटणीस समीर शेख, विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रविण भोळे, उदगीर तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानी कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रदिप जोंधळे, महिला विधानसभा अध्यक्ष डाॅ. रेखा रेड्डी, महिला शहराध्यक्षा मधुमती कनशेट्टे, युवती तालुकाध्यक्षा संगीता आवळे, महिला शहर कार्याध्यक्षा वैशाली कांबळे, रंजना चिखळे, दिपा मुक्कावार, निता गुडमेवार, स्वाती रेणापुरे, सुरेखा रेणापूरे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.