महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण च्या अशासकीय सदस्यपदी ‘अनिता यलमटे’ यांची नियुक्ती
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024’ समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचे कार्याध्यक्ष विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी तयार केलेल्या उपसमिती वर ‘महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024’ मध्ये ‘अशासकीय सदस्य’ म्हणून उदगीर येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका तथा लेखिका अनिता यलमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण समितीवर नियुक्ती झाल्याचे पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये सांस्कृतिक मंत्रालय कार्यासन अधिकारी गोपीचंद चव्हाण यांच्या द्वारे दिले गेले.
अनिता येलमटे यांच्या समवेत महाराष्ट्रातील डॉ.गणेश राऊत, शाहीर हेमंत मावळे, प्रा. सुनील भणगे, राजेश प्रभूसाळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ. ह .साळुंखे यांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले सांस्कृतिक धोरण तयार केले होते. या समितीवर लातूर जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात व वाचन लेखन चळवळीत काम करणाऱ्या प्रयोगशील शिक्षिकेची, लेखिकेची नियुक्ती झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य रामचंद्र तिरुके, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, विद्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर जयंतजी जोशी, प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांतजी मुळे ,लालबहादूर संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय सदस्य तथा स्थानिक कार्यवाह शंकरराव लासुणे, प्राथमिक विभागाचे अध्यक्ष व्यंकटराव गुरुमे, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अनंतराम कोम्पले, उपमुख्याध्यापक अरुण पत्की ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,किरण नेमट, माधव मठवाले, सर्व शिक्षक वृंदांनी व साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.