लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा तहसीलदार उज्वला पांगरकर
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीने अहमदपूर चाकूर विधासभा मतदार संघात स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती होत आहे.दि.१६ रोजी यशवंत विद्यालय अहमदपूर येथे स्वीप पथकाद्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर यांनी उपस्थितीत विद्यालयातील शिक्षक बांधवांना संविधानाने दिलेले मतदानाचा अधिकार येणाऱ्या २० नोव्हेंबर २०२४ सर्वांनी बजवावा.बाल कलाकारांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना मतदानाची आठवण करुन देऊन कर्तव्य बजावण्यासाठी सांगून आपणही या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावे असे आवाहान केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी राष्ट्रीय लोकउत्सावात सर्व मतदार बंधु-भगिणींनी मतदानाचा हक्क
बजाऊन आपले हक्काचे सरकार स्थापन करावे.विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून जनजागृती केलीच आहे.तरीपण २० नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी बुधवर पाठवून द्यावेत.शेजारी, नातेवाईक,मित्रबांधव यांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन हे कर्तव्य पार पाडण्यासाठी ,राष्ट्रीय कार्यात सर्वांनी हातभार लावावेत असे मत व्यक्त केले.
या अभियानांसाठी जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकुर मॅडम सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे,अहमदपूर चे तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकूर चे तहसीलदार नरसिंग जाधव, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघात जनजागृतीसाठी विशेष स्वीप कला पथकाद्वारे कार्यक्रम नियोजन करण्यात आले आहे.
सदरील चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वीपचे पथक प्रमुख राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,मोहन तेलंगे,संभाजी यलपुरवाड प्रा.शिवशंकर पाटील,कपिल बिरादार आदिनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार उज्वला पांगरकर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे,महसुल सहाय्यक प्रल्हाद रिठे, केंद्रप्रमुख दयानंद मठपती शाळेचे मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग ततापुरे,शिवाजी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सदरील स्पर्धा पार पडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कपिल बिरादार तर आभार माधव वाघमारे यांनी मानले.