लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात दिवाळी अभ्यास पुस्तिकेचे विमोचन
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय विद्यार्थ्यांसाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवित असते.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका तथा पहिली, दुसरी विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीतील अभ्यासासाठी,विविध उपक्रमांचा समावेश असलेली ‘दिवाळी अभ्यास ‘नावाची पुस्तिका तयार केलेली आहे.
या पुस्तिकेचे विमोचन मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांसमवेत विमोचन केले.यावेळी श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी विद्यार्थीहित डोळ्यासमोर ठेवून स्वहस्ताक्षरात खूप छान प्रेरणादायी दिवाळी अभ्यास पुस्तिका तयार केली,त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.