जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांवर गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई

0
जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांवर गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई

जुगार अड्ड्यावर छापा; १० जणांवर गुन्हा उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई

उदगीरः मध्यरात्रीच्या वेळी शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका घराच्या गच्चीवर सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा मारून ४७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणाविरुद्ध गुन्हा झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील लालबहादूर शास्त्री शाळेच्या पाठीमागे रमेश गिरी यांच्या राहत्या घराच्या गच्चीवर काहीजण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मध्यरात्री अचानक छापा मारला असता तेथे आरोपी मारोती रामन्ना वरदाळे (रा. हनुमान नगर सिग्नल नं. २ उदगीर), माजीद हवालदार (रा. वाढवणा ता. उदगीर), आकाश प्रभु कांबळे (रा. अशोकनगर, उदगीर), किशोर प्रल्हाद आंवरे (रा. मुक्रमावाद ता. मुखेड), नवनाथ शेषेराव जाधव (रा. वडार गल्ली, उदगीर) हे पाच जण आर्थिक फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळून आले. पोलिसांनी रोख रक्कम, दोन मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ४७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश बापुराव कदम यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक पोलीस हवालदार राहुल नागरगोजे करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *