प्रभात सुर्यवंशी यांची उदगीरच्या व्यवस्थापकीय समिती आयएमसीवर निवड
उदगीर (प्रतिनिधी) : जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात अमृत सुर्यवंशी यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यांची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी.आय), उदगीरच्या व्यवस्थापकीय समिती आयएमसी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अंतर्गत व्यवस्थापन समितीवर शासनामार्फत तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात भरिव योगदान असलेल्या सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याने सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन व्यक्त करत आहेत.