भाजप नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह 71 लोकांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : येथील लाईफ केअर हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉ. अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या विरुद्ध फिर्यादी नरेंद्र कुमार दिगंबर बालूरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे डॉ. अर्चनाताई शैलेश पाटील चाकूरकर यांच्यासह 71 लोकांच्या विरुद्ध गुरंन 574 /24 कलम 409, 416, 420, 467, 468, 471, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये दिनांक 19 ऑक्टोबर रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर येथील न्यायालयाने एम के एस 156 (3) सीआरपीसी प्रमाणे दिलेला आदेश आज प्राप्त झाल्यामुळे आज गुन्हा दाखल करण्यात आला, असे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटल उभारले जात असताना नोकरीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची मागणी केली जात होती. ज्यामध्ये प्राधान्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो घेतले जात होते. त्या कागदपत्राच्या आधारावर आरोपी क्रमांक एक ते तेरा यांनी घेतलेल्या कागदपत्राचा गैरवापर करून फसवणूक केली आहे. असा फिर्यादीचा आरोप आहे.ज्यामध्ये भाजपने त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर, डॉ. योगीराज वैजनाथ चिद्रे, डॉ. बसवराज रमाकांत मलशेट्टे, डॉ.मंगेश मनोहर एरनाळे, डॉ. सुभाष लक्ष्मणराव मुस्तापुरे, डॉ. शैलेश येरोळकर, डॉ. आनंद अश्टुरे, डॉ. धनराज मुळे, डॉ. तानाजी मोरे, मिलिंद व्यासकुमार घनपाटी, डॉ. पद्मनाथ देशमुख, डॉ. कालिदास बिरादार, अनिरुद्ध जोशी हे लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक मंडळ होते. या संचालक मंडळांनी उदगीर येथील सहकारी अर्बन को-ऑपरेटिव बँकांच्या मदतीने अपहार केल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये शाखाधिकारी सहयोग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक तसेच रमेश नागप्पां अंबरखाने, चंद्रकांत गणपती वैजापूरे, मल्लिकार्जुन गदगेप्पा मानकरी, विनोद गोवर्धनदास टवानी, ललिता रामराव मोमले, रामराम संग्राम मोमले, गांधारी सोपानराव नेत्रगावकर, आशिष रमेश अंबरखाने, नरसिंग हूलाजी देवकते, रावसाहेब रामराव जाधव, उमा शिवाजीराव मुक्कावार, शैलेश नागप्पा अंबरखाने, प्रशांत प्रभाकर मांगुळकर, विलास पंडितराव पानगावकर हे सर्व सहयोगी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक असून दुसरी बँक त्या बँकेचे शाखाधिकारी अर्थात सिद्धेश्वर सहकारी बँक लिमिटेड लातूर शाखा उदगीर यांच्यासह शिवकुमार किशनराव पाटील, विधीज्ञ उमाकांत शिवप्पा पाटील, विधीज्ञ कल्याण उटगे, प्रा. सौ. चंद्रकला रोटे, राजेंद्र मुंडे, संभाजीराव बोडके, सुखदा मांडे, शिवराज सुगरे, पंडितराव कर्डिले, हरिश्चंद्र कोंबडे, अरविंद लातूरे, प्रशांत शेटे, विजयकुमार मल्लिकार्जुन मानकरी, रामचंद्र आलुरे, भीमाशंकर बेंबळकर, सुनीता लोहारे, युवराज लोखंडे, अजय बाबुराव पाटील, गिरीश पत्रिके, श्रेणिक गांधी, सिद्रामप्पा मिटकरी हे सर्व सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक होते. या बँकेच्या शिवाय शाखाधिकारी महात्मा गांधी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उदगीर यांचे शाखाधिकारी तसेच या बँकेचे संचालक बसवराज मलशेट्टे चेतन चंद्रकांत वैजापूरे, येथे चीद्रे योगीराज वैजनाथप्पा, मंगेश मनोहर एरनाळे, सुभाष लक्ष्मणराव मुस्तापुरे, चंद्रकांत गणपती वैजापुरे, तानाजी शिवाजी मोरे, चंद्रकांत विश्वनाथ पाटील, महेश माणिकराव पाटील, कैलास रमेश पाटील, संतोष गुरुनाथ तोडकर, दिलीप विश्वनाथ पांढरे, दिगंबर यशवंतराव बिरादार, हनुमंत माणिकराव बिरादार, राजकुमार विश्वनाथ बिरादार, सुनील हनुमंतराव भताडे, मिलिंद व्यासकुमार घनपाटी, सतीश बाबुराव फुलारी, राजू झेटिंग कणिक, मल्लम्मा हनुमंत कल्पे या 71 जणांच्या विरुद्ध कागदपत्राचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी व इतर हॉस्पिटल मधील तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी या सर्वांच्या नावाने बोगस कर्ज देणे म्हणजे अंदाजे दहा कोटीच्या वरून कर्मचाऱ्यांच्या नावाने तोतया व्यक्तीस पुढे करून कर्ज घेतले आहे. व आरोपी क्रमांक 14 ते 71 यांनी बँकेने कर्ज घेणारी व्यक्ती खरी व्यक्ती उपस्थित नाही, हे माहीत असून सुद्धा फिर्यादीच्या कागदपत्राचा गैरवापर करून फसवणूक करून कर्ज घेण्याच्या उद्देशाने खोटी कागदपत्रे तयार करून फिर्यादीच्या खोट्या सह्या करून, मोठी कर्जाची रक्कम आरोपी क्रमांक 1 ते 13 यांनी उचलून घेऊन हडप केलेली आहे. असा आरोप ठेवलेला आहे. व आरोपी क्रमांक 14 ते 71 यांनी एकमेकांशी संगणमत करून ती रक्कम दिलेली आहे. त्या रकमेचा आरोपी क्रमांक 1 ते 13 यांनी अपहार केला, वगैरे न्यायालय उदगीर यांचे एम के एस 156 (3) सीआरपीसी प्रमाणे प्राप्त झालेल्या आदेशान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करत आहेत.