उदयगिरीची विद्यापीठ सचिव सुप्रिया जगताप
उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या विद्यापीठ सचिवपदी बी.एससी. द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थिनी सुप्रिया अनिल जगताप हिची निवड झाली आहे. यावेळी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा.डॉ.सुरेश लांडगे, ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, प्रा.डॉ.एम.बी.स्वामी, प्रा.डॉ.जे.एम.पटवारी, प्रा.डॉ.बी.एस.होकरणे, प्रा.डॉ.एस.जी.अन्सारी, पर्यवेक्षक प्रा.एस.वी.मुडपे, प्रा.टी.एन.सगर यांची उपस्थिती होती. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.