जिल्हा न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना गुन्हा नोंदवला – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
उदगीर (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना आपल्यासह अन्य 70 जनावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी एफ आय आर दाखल केला असल्याचे मत लाईफ केअर हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लाइफ केअर अँड रिसर्च सेंटर उदगीर संदर्भात माझ्यासह अन्य 70 जनावर 156 (3) या कलमाद्वारे चौकशीचा आदेश दिले. याबाबतची माहिती दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मला मिळाली.
या प्राप्त माहितीच्या आधारे मी व माझ्या सहकाऱ्यांनी जिल्हा न्यायालय उदगीर येथे रिविजन पिटीशन दाखल केले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाने दिनांक 8 ऑक्टोबर 2024 च्या चौकशी आदेशाला दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी स्थगिती दिली. स्थगिती देताना जिल्हा न्यायालयाने स्थगितीच्या आदेश देऊन संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्याचे निर्देश दिले होते. तरी परंतु उदगीर ग्रामीण पोलीस यंत्रणेने दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या व इतर 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा न्यायालयामध्ये याप्रकरणी स्थगिती आदेश दिलेला असताना या आदेशाचा अवमान करून हा दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. असे आमचे मत असल्याचे डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी म्हटले आहे.
चौकट….
स्थगिती आदेशाचे कागदपत्र आमच्या हाती नव्हते…..
उदगीर न्यायालयाच्या वतीने आम्हाला याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याच्या संदर्भात एम के एस 156 (3) सीआरपीसी प्रमाणे गुन्हा नोंद करण्याच्या आदेशान्वये आम्ही गुन्हा नोंद केला आहे. आम्ही गुन्हा नोंद करेपर्यंत आमच्या हाती संबंधित प्रकरणाच्या स्थगिती आदेशाचे कोणतेही कागदपत्र आले नव्हते. त्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजकुमार पुजारी
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, उदगीर ग्रामीण