उदगीरात राधे दांडीया महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने शहरातील दूध डेअरी परिसरातील मैदानात राधे दांडीया महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यास महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दांडीया महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक
देण्यात आले. यावेळी राहुल केंद्रे, सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके, डॉ. विश्वनाथ डांगे, डॉ. बस्वराज स्वामी, स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित औटे, दीपाली औटे, श्याम ठाकूर, रविंद्र हसरगुंडे, सुनील कोळी, संगीता नेत्रगावे, मीरा चंबुले, अनुराधा मुक्कावार, मधुमती कनशेट्टे, काजल मिरजगावे, अस्मिता सोनफुले, प्रीती कवटीकवार, शितल नाटकरे, सुमन पवार, श्रद्धा कोळी, सुनीता तेलंगे, वैशाली कांबळे यांची उपस्थिती होती. दूध डेअरी परिसरात राधे दांडीया महोत्सव पार पडला होता. शहरातील महिला भगिनींनी मोठया संख्येने दांडिया खेळण्यासाठी गर्दी केली होती. आई. जगदंबेचा
गजर करीत महिला तल्लीन होऊन दांडिया खेळत होत्या.
हा दांडीया महोत्सव यशस्वी करण्यासाठी राधे दांडीया महोत्सव समितीचे सह आयोजक अश्विनी मानकरी, संगीता पाटील, डॉ. सुलोचना येरोळकर, स्वाती गुरुडे, पल्लवी मुक्कावार, मानसी चन्नावार, स्नेहा चणगे, चंचला हुगे, डॉ. शितल जाधव, सुप्रिया हिंगणे, पल्लवी मुक्कावार, गंगा पांडे, महिता कोयले, राखी वरनाळे, अँड. पूनम टाकळे, निकिता इनानी, आशा कुंडगिर सह अनेकांनी सहकार्य केले.यावेळी महिला व युवती स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.