आदर्श शिंदेंच्या गीतातून विश्वजित गायकवाड यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कामाचे कौतुक!
‘आपला लढ़वय्या, विश्वजीत भैय्या’ हे गीत लवकरच प्रसारित होणार
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इंजि. विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशनतर्फे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदेंच्या भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . भिम गीत गायनासाठी आदर्श शिंदे उदगीर शहरात आले असता उदगीर शहरातील अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सोबत त्यांची चर्चाही झाली. या चर्चेतून लोकांनीच विश्वजीत गायकवाड यांच्या फाऊंडेशनतर्फे लातूर जिल्ह्यात केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याची माहिती दिली .विश्वजीत गायकवाड यांनी केलेले कार्य पाहून समाजातील इतर गरजू लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन कार्य करण्याची उत्तम जाण असणारा विश्वजीत सारखा दुसरा नेता आपण पाहिला नाही, अशा शब्दात आदर्श शिंदे यांनी गौरव उद्गार काढले. त्याच वेळी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गीतकार मंदार चोळकर यांच्याकडून या कार्यावर गीत बनवून घेतले आणि मुंबई येथे त्या गिताचे रेकॉर्डिंगही पूर्ण करण्यात आले . या गीताचे लवकरच प्रसारण करण्यात येणार आहे .प्रथमच उदगीर येथील कार्याचे आदर्श शिंदे यांच्या आवाजातील गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या या गितामुळे महाराष्ट्र भरात आता उदगीर चे नाव पोहचणार आहे .
“नव्या लढ़ाईसाठी सज्ज झाला….
आपला लढ़वय्या..विश्वजीत भैया….” “झुंजायची तयारी अरे विश्वजीत भय्या, सगळ्यात भारी विश्वजीत भैया ,
बाण्यातही करारी ,विश्वजीत भैया… विश्वजीत भैया !
अशी रचना असणारे हे गीत आहे .
इंजि. विश्वजित अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशन द्वारे विश्वजीत गायकवाड यांनी ज्ञान , आरोग्य , महिला सबलीकरण , तरुणांच्या हाताला काम , बालकांना शिक्षण , ज्येष्ठांसाठी धार्मिक कार्यक्रम आणि मुख्य म्हणजे आपले संविधान गावोगावी पोहचविण्याचे काम अशा उल्लेखनीय केलेल्या कार्यामुळे आदर्श शिंदे प्रभावित झाले . विकासाची मूळ संकल्पना हीच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले . महिला सक्षमीकरण , युवकांचे आरोग्य साठी व्यायाम शाळा साहित्य , युवकांना आवश्यक असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन साठी आवश्यक पुस्तके , महापुरुषांची चरित्र ग्रंथ आणि तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे दिलेली स्कूल बॅग यामुळे त्यांचा दूर झालेला न्यूनगंड आणि चेहऱ्यावर उमटलेले हसू याबत श्रोत्यांनी माहिती दिली . यामुळे आदर्श शिंदे आणि मंदार चोळकर हे प्रभावित झाले . या त्यांच्या कार्याचा लेखा जोखाच या गीतातून मांडला गेला आहे .
या गीत रेकॉर्डिंग वेळी मुंबई येथे आदर्श शिंदे यांच्या सोबत वरिष्ठ तंत्रज्ञ अवधूत वाडकर , इंजि. विश्वजित गायकवाड आणि आदर्श शिंदे यांच्या संचातील गायक, वादक उपस्थित होते.