विश्वजीत गायकवाड हे सामाजिक अभियंता आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी – निवृत्तीराव सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : केवळ राजकारण म्हणून नव्हे तर समाजकारण करण्यासाठी राजकारणाचा आधार घेऊन समाजाची जडणघडण घडवणारा खरा सामाजिक अभियंता म्हणून विश्वजीत गायकवाड यांचे कार्य उदगीर विधानसभा मतदारसंघात चालू आहे. गोरगरिबांसाठी राबवलेली उपक्रम असतील, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम असतील, शैक्षणिक क्षेत्रात राबवलेली उपक्रम असतील, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबवलेली उपक्रम असतील, ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा विचार करून राबवलेले उपक्रम असतील, हे सर्व स्वखर्चाने आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करत असताना केवळ जनतेच्या कल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विश्वजीत गायकवाड काम करत आहेत. हे काम म्हणजेच समाज घडवणे आहे, ज्या पद्धतीने एखादा अभियंता घर बांधतो, तशाच पद्धतीने समाज बांधण्याचे काम इंजिनिअर विश्वजीत गायकवाड करत आहे म्हणून मी त्यांना सामाजिक अभियंता म्हणतो. असे स्पष्ट विचार पॅंथरनेते निवृत्ती राव सांगवे यांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांना मानवंदना देता यावी, यासाठी जगभरातील ख्यातनाम भिक्खू संघाच्या प्रमुखांना आणि देशातील शेकडो भंतेजींना उदगीर येथे बोलावून विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अस्थी कलश उदगीर शहरात आणून त्याची मिरवणूक काढून मानवंदना देण्यासाठी विश्वशांती बौद्ध विहारात उपलब्ध करून दिल्याबद्दल बौद्ध समाज त्यांचा ऋणी आहे. खरे तर हे ऋण फेडणे शक्य नाही, परंतु त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केलं जावं, यासाठी उदगीर शहरातील दत्तनगर, गोविंद नगर आणि सोमनाथपूर परिसरातील समाज बांधवांनी बहुजन विकास अभियान च्या माध्यमातून इंजी.विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचा सत्कार घडवून आणला. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मला भूषवता आले. याचा मला खरोखर आनंद आहे. ज्याला सामाजिक जाण आहे, भान आहे. असा युवा नेता आम्हाला लाभल्यामुळे चळवळीतील सर्व कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले आहेत, असे विचार राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष पॅंथरनेते निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केले.
ते संविधान भवन, नांदेड रोड येथे इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना पुढे म्हणाले की, समाजाला खऱ्या अर्थाने ज्या नेत्याची गरज होती, असा नेता आता समाजाला लाभला आहे. त्यामुळेच आम्ही सर्व आंबेडकरी विचाराच्या चळवळीतील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, हा विचार आमच्या डोळ्यासमोर सदैव राहतो आणि आमच्या अशा अपेक्षांना पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून आम्ही विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्याकडे पाहत आहोत, राजकारणामध्ये पक्ष, गट , तट हे सर्व चालतात, परंतु आम्ही समाज बांधव म्हणून विश्वजीत गायकवाड यांच्या पाठीशी राहणार आहोत, आणि ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा जिंकून दाखवली त्याच पद्धतीने विधानसभा देखील जिंकून दाखवू असाही विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना इंजिनियर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड म्हणाले की, मला माझ्या आजोबापासून समाजकार्याचा वसा आणि वारसा लाभला आहे. तो माझे काका असतील, माझे वडील असतील या सर्वांनी जपला आहे. तोच जपत जपत मी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. हे काम करत असताना मला आनंद वाटतो. गोरगरिबांना मदत करता आली त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आले, याच्यासारखा आनंद दुसरा कोणता नसतो. हे मी अनुभवतोय. आणि त्यासाठीच मी समाजसेवेमध्ये अग्रेसर झालो आहे. माझ्या काही मित्र मंडळींनी आग्रह धरून उदगीर विधानसभा मतदार संघामधून उमेदवारी लढवण्यात चा हट्ट धरला आहे. आणि मीही त्यांना शब्द दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी उमेदवार आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होईल त्या लढतीमध्ये आपल्याला जिंकता आले पाहिजे त्यासाठी तुमचे पाठबळ मला राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार एकुरकेकर यांनी केले. आपल्या प्रस्ताविकात त्यांनी स्पष्ट केले की, जो समाजासाठी झटतो, समाज त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. हा उदगीरच्या मातीचा गुणधर्म आहे. तुम्ही आमच्यासाठी कष्ट सहन करता तर आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबत राहू. लोक अफवा पसरवतील, नको नको त्या चर्चाही करतील, पण आम्ही तुमची साथ सोडणार नाही. पॅंथर नेते निवृत्तीराव सांगवे हे आंबेडकरी चळवळीतील मोठे नेतृत्व आहे. आणि त्यांनी तुम्हाला साथ देण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व जनता तुमच्या सोबत राहील, असे अभिवचनही दिले.
त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन विकास अभियानचे संजय राठोड, मानसिंग पवार, युनुस शेख, राजकुमार गाठाडे, लक्ष्मण आडे, सुनील पाटील, पप्पू शेवाळे, उमाकांत डोंगरे, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रमुख ज्योतीताई कांबळे, पप्पू डोंगरे, मनोज पवार, गौरव राठोड, काशिनाथ बिरादार, गुणवंत हलकुडे, शिवाजीराव श्रीवास्तव, विशाल मार्तंडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आघाडीची उपस्थिती लक्षणीय होती.