तहसील प्रशासनाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली
मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो ! या घोषवाक्याने शहर दुमदुमले
अहमदपूर (गोविंद काळे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अहमदपूर चाकूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने दि.१९ आँक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता विमलाबाई देशमुख कन्या शाळा येथून अहमदपूर शहरात भव्य दिव्य स्वरुपात रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आले.
अहमदपूर चाकूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी १००% मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर,चाकुरचे तहसीलदार नरसिंग जाधव ,पोलिस बंधु,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकडे,केंद्रप्रमुख प्रमुख दयानंद मठपती,नायब तहसीलदार संजय भोसीकर, मुनवर मुजावर,महसुल सहाय्यक प्रल्हाद रिठे स्वीपचे सदस्य
महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,
मोहन तेलंगे,बसवेश्वर थोटे,
कपिल बिरादार,प्रा.शिवशंकर पाटील,संभाजी यलपुरवाड,विवेकानंद बंडे,विमलाबाई शाळेचे मुख्याध्यापक सौ सुनिता कोयले,सांस्कृतीक विभाग प्रमुख चंद्रकांत पेड,स्काऊड गाईड विभाग प्रमुख श्रीम.उषा रेड्डी
यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,खय्युम शेख,जि.प.प्रशालेचे नागनाथ कदम,दत्तात्रय गुरमे, जि.प.प्राथमिक शाळेचे पाडुरंग उगिले,महात्मा फुले विद्यालयाचे विष्णुपंत डांगे,सुनिल सुरकुटे, सूर्यकांत चिमाजी, कमला नेहरू शाळेचे पांडूरंग कुंभार,उमाकांत पांचगे,पाडूरंग नरवटे ,रविंद्रनाथ टागोर शाळेचे राम शेळके, तुकाराम देवकते
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,तहसील कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रशासनाने शहरात महात्मा बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,आझाद चौक,पोस्ट ऑफिस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय या दिशेने भव्य दिव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
मतदार रॅलीचे उद्घाटन मा.तहसीलदार उज्वला पांगरकर,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
उपस्थितीत मान्यवरांचे विद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले.मतदार जनजागृती साठी “मतदार राजा जागा हो..लोकशाहीचा धागा हो..! अशा घोषणा देत शहरात भव्य रॅलीचे दर्शन घडविण्यात आले.रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक माधव वाघमारे तर आभार कपिल बिरादार यांनी मानले.