क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचे तेलगाव नगरीमध्ये स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले
अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 22 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजी जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तळेगाव शाळेच्या वतीने स्वच्छता अभियान रॅली पार पडली. त्यावेळी प्राचार्य जेबाबेरला नादार, उपसरपंच पंढरीनाथ जाधव, प्रा.आरोग्य केंद्र तेलगावचे डॉ रोहन बचाटे, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नागरिक ई उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी गावामध्ये नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. पथनाट्य, भाषणे, घोषवाक्य, स्वच्छतेच्या घोषणा या माध्यमातून गावामध्ये स्वच्छतेची जनजागृती केली. याबद्दल गावातील ग्रामपंचायतकडून चांगले सहकार्य लाभले. शाळेचे शेवटी आभारही मानले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तेलगाव यांच्याकडूनही मोठे सहकार्य लाभले. तसेच सुपरवायजर गोविंद वलसे, धनंजय राचमाळे यांनी अथक मेहनत घेतली.