विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पाच अर्ज दाखल ;उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज मंगळवार (दि.22) पासून सुरू झाली असून आज पहिल्याच दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यातच शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे दोन दिवसांचा ब्रेक लागणार आहे. त्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक घेण्यासाठी नुकतीच निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी कऱण्यात आली असुन विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. तर २९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असणार आहे. आज दि २२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी १. वाघलगावे रावसाहेब निवृत्तीराव रा. राचन्नावाडी ता चाकुर पक्ष अपक्ष २.जाधव विनायक सोनबा रा. सावरगाव रोकडा ता अहमदपूर पक्ष राष्ट्रीय मराठा पार्टी जात मातंग ३. जाधव गणेश दौलतराव रा तेलगाव ता अहमदपूर पक्ष अपक्ष ४. माधव रंगनाथ जाधव रा खंडाळी ता अहमदपूर पक्ष अपक्ष ५. तिडोळे बालाजी लिंबाजी रा हासर्णी ता अहमदपूर पक्ष अपक्ष आदी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय अहमदपूर येथे दाखल केले आहेत.
येणाऱ्या चार ते सहा दिवसात अहमदपूर- चाकूर मतदार संघातील प्रतिष्ठित नेते पूर्णपणे ताकदीने, रॅली काढत आपला उमेदारी अर्ज दाखल करतील. शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे गुरुवार-शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यन, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांचा अवधी आहे. पण चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. सार्वजनिक सुट्टी असल्याने शनिवार आणी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही त्यामुळे प्रत्याक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांचाच वेळ असेल. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तहसील कार्यालय अहमदपूर येथे आपला उमेदवारी अर्ज द्यावा लागणार आहे.
अहमदपूर -चाकुर तालुक्यातील निवडणूक यंत्रणा विधानसभा निवडणुक पारदर्शकपणे तसेच कुठलेही गालबोट लागु नये यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी दिली आहे.