शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठाच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयाच्या ज्ञान पंढरी क्रीडा संकुलात आंतर विभागीय फुटबॉल पुरुष स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अ ब क ड पुरुष संघाने सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी टी शिंदे यांच्या हस्ते झाले.प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य रामराव एकंबे,प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे,लातूर जिल्हा फुटबॉल संघटना उदगीर अध्यक्ष शेख निजाम,प्रा. कमल पवार, प्रबंधक बालाजी पाटील, अधीक्षक गुरनाळे व्ही.डी.आर एम.लाडके यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अरविंद नवले यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.
या स्पर्धेत क विभागाचा संघ प्रथम, ड विभागाचा द्वितीय तर तिसरा क्रमांक ब विभागाने पटकावला. स्पर्धेचे बक्षीस वितरण डॉ.एस.डी. निटुरे, प्रबंधक बालाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा विभागातील अनेकांनी परिश्रम घेतले. पंच म्हणून शेख निजाम, कादरी सय्यद खाजा, जागीरदार मोहम्मद बाहोद्दीन, शेख मोहम्मद अनस, डॉ.शिवानंद पाटील, गयासुदिन शेख, सय्यद अलीम व निवड समितीचे अध्यक्ष प्रा.नेहाल खान डॉ. आनंद भट, डॉ. उस्मान गणी यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरसिंग कदम यांनी तर आभार प्रा.नेहाल खान यांनी मानले.