जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा संपन्न
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड जि.लातूर आयोजित राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२४-२५ अन्वये जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा विद्याविकास माध्यमिक विद्यालय, श्रीनगर,लातूर येथे पार पडल्या. भूमिका अभिनय स्पर्धेसाठी शासकीय निवासी शाळा बावाची ता.रेणापूर येथिल विद्यार्थ्यांनी वैयक्तिक सुरक्षा या विषयावर अभिनयाचे सादरीकरण केले.तर अनुसुचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा लामजना यांनी ‘पौष्टिक आहार व आरोग्य’ या विषयावर भूमिका अभिनयाचे सादरीकरण केले.
लोकनृत्य स्पर्धेमध्ये अनुसुचित जाती नवबौध्द शासकीय निवासी शाळा लामजना यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर , जि.प.प्रशाला भातागंळी यांनी मादक द्रव्याचे सेवन रोखणे, जि.प.प्राथमिक शाळा पारुनगर,मुरुड यांनी मुलगा, मुलगी एक समान, संधीची समानता या विषयावर लोकनृत्य सादरीकरण केले.शासकीय निवासी शाळा बावाची यांनी वैयक्तिक सुरक्षा तर शासकीय आश्रम शाळा सांगवी तांडा यांनी मादक द्रव्याचे सेवन रोखणे हा विषय घेऊन सादरीकरण केले.एकापेक्षा एक दर्जेदार लोकनृत्यांनी उपस्थितीत प्रेक्षकांची मने जिंकली.
सदरील भूमिका अभिनय स्पर्धेत अनुसुचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय शाळेने प्रथम तर शासकीय निवासी शाळा बावची यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.लोकनृत्य स्पर्धेत प्रथम शासकीय निवासी शाळा बावाची,द्वितीय क्रमांक अनु जाती नवबौध्द शासकीय निवासी शाळा लामजना तर तृतीय क्रमांक जि.प.प्राथमिक शाळा पारुनगर,मुरुड यांनी पटकावला.
कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचे प्राचार्य डाँ.भगिरथी गिरी, अधिव्याख्याता श्रीमती गंगा मेनकुदळे,विषय सहायक निशिकांत मिरकले,श्रीमती प्रज्ञा आव्हाड, केंद्रप्रमुख हेंमत जोशी,साधनव्यक्ती धर्मराज भोई,श्रीमती मंजुषा आचमे,श्रीमती मुन्नाळे,श्रीमती लटपटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी परिक्षक म्हणून अधिव्याख्याता गंगा मेनकुदळे, यशवंत विद्यालय अहमदपूर चे राज्यपुरस्कार प्राप्त कला शिक्षक महादेव खळुरे,संगीत शिक्षक बालाजी चौधरी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.नृत्य स्पर्धेसाठी शाळेचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्र संचलन चाकूरचे साधनव्यक्ती जयेशकुमार करडीले तर आभार हुमनाबादे यांनी मानले.