जीवन प्रयाग फाउंडेशनचे उपक्रम लोककल्याणकारी – प्रा.डॉ विनोद चनाळे
उदगीर : (एल.पी.उगीले)जीवन प्रयाग फाऊंडेशनचे सभासद निलेश जैन यांच्या जन्मदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. असे उपक्रम चांगले आहेत, जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना साहित्य मिळाले, शालेय विद्यार्थी हे भारताचे उद्याचे भविष्य आहेत. असे मत प्रा.डॉ. विनोद चनाळे यांनी व्यक्त केले. ते जीवन प्रयाग फाऊंडेशन, आयोजित निलेश जैन यांच्या जन्मदिनानिमित्त लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यालय, उदगीर येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन शिवशेटे हे होते. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते प्रा.डॉ. विनोद चनाळे, प्रमुख पाहुणे श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य राजेश शेटकार , लदाडे, अमेय गवारे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात सचिन शिवशेटे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची स्तुती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्राक्ष लाल यांनी केले तर प्रास्ताविक प्रभात सुर्यवंशी यांनी केले,आभार अमेय गवारे यांनी मानले.