शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रो. डॉ.रामकिशन मांजरे यांची निवड
उदगीर (प्रतिनिधी) : किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ.रामकिशन मांजरे यांची नुकतीच निवड झालेली आहे. डॉ.रामकिशन मांजरे हे अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील असून ते समाजशास्त्राचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगरावजी पाटील एकंबेकर,सचिव पी टी शिंदे ,सहसचिव हिरागीर गिरी, उपाध्यक्ष माधवराव पाटील, कोषाध्यक्ष गुंडेरावजी पाटील, पृथ्वीराज पाटील एकंबेकर,राहुल पाटील सास्तुरकर,पुंडलिकरावजी पाटील पाटोदेकर, बाबासाहेब पाटील व सर्व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.