चेक पोस्टवर एक लाख 80 हजाराची रोकड पकडली

0
चेक पोस्टवर एक लाख 80 हजाराची रोकड पकडली

चेक पोस्टवर एक लाख 80 हजाराची रोकड पकडली

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोर सुरू असून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शिरूर जानापूर चेक पोस्टवर एका कारमधून नेण्यात येत असलेले एक लाख 80 हजार रुपयांची रोकड उदगीरच्या स्थायी निगराणी पथकाने मंगळवारी पकडली आहे. याबाबत आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जानापुर चेक पोस्टवर स्थायी निगराणी पथक क्रमांक तीन वाहनांची तपासणी करत असताना, राणीसावरगाव येथून हैदराबाद कडे निघालेल्या कार क्रमांक एमएच 22 बीसी 0 350 (ईरटीका) कार मध्ये एक लाख 80 हजाराची रोकड मिळून आली. या पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून राजेश मूळजे, पद्माकर फुले, लिमराज मुळे, योगेश रावणगावे यांचा समावेश होता. या प्रकरणाची माहिती मिळताच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या गाडीमध्ये इसा तांबोळी (वय 33 वर्ष रा. अहमदपूर) व गोविंद त्र्यंबक ढोने (गाडी मालक, रा. राणीसावरगाव) हे दोघे होते. सदरील रक्कम ही निगराणी पथकाने निवडणूक विभाग कडे जमा केली आहे. सदरील रक्कम ही कशासाठी घेऊन जाण्यात येत होती? रकमेचा हिशोब, सबळ पुरावे सादर केल्यास संबंधितांना ती रक्कम परत देण्यात येणार आहे. अशी ही माहिती प्रवीण सुरडकर यांनी दिली आहे. जिल्हा अधिकारी यांनी सर्व विभागाची तपासणी करून सर्व सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सर्व पथकांनी प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *