अपहरण प्रकरणातील आरोपींना 10 तासाचे आत ताब्यात घेवून मुलाची सुटका

0
अपहरण प्रकरणातील आरोपींना 10 तासाचे आत ताब्यात घेवून मुलाची सुटका

अपहरण प्रकरणातील आरोपींना 10 तासाचे आत ताब्यात घेवून मुलाची सुटका

लातूर (एल.पी.उगीले) : अपहरण झालेल्या तुलाच गांधीच्या पोलिसांनी दहा तासाच्या आत अटक करून त्या मुलाची सुटका केली आहे.
याबाबत थोडक्यात माहिती की, पोस्टे गांधीचौक हद्दीमध्ये दि. 22/10/2024 रोजी फिर्यादीने फिर्याद दिली की, त्याचे मुलास दिनांक 22/10/2024 रोजी सकाळी 10:00 वा. सुमारास मांजरा आर्युवेदीक महाविद्यालय समोर, गांधी मार्केट, लातूर येथून काही आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादीच्या बहीनीच्या नावे असलेल्या जमीनीच्या वादातून अपहरण करून खुन करण्याच्या उद्येशाने जोरजबरदस्तीने झटापट करुन धाक दाखवून पळवून घेवून गेले आहे. अशी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे गांधी चौक येथे आरोपीचा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल होताच आरोपीतांचा शोध घेणे कामी सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, डॉ. अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक, बी. चंद्रकात रेड्डी सहा.पोलीस अधिक्षक, चाकुर चार्ज लातूर शहर यांचे मार्गदर्शना खाली साहेबराव नरवाडे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ पथक तयार करून अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान गुन्ह्यातील आरोपीनी अपहरण केलेल्या पिडीत मुलाचा खून करण्याच्या उद्देशाने येरमाळा येथून बार्शीकडे जात असल्याची माहिती पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांना मिळाली. त्यावर सदर पथकाने तात्काळ बार्शी ग्रामीण पोलीसांशी संपर्क करुन आरोपींबाबत नाव व वर्णनाची माहिती देवून नाकाबंदी लावण्यास सांगितली. त्यावरून बार्शी ग्रामीण पोलिसांनी ताबडतोब रस्त्यावर नाकाबंदी लावली, गांधी चौक च्या पथकाने सदर गाडीचा पाठलाग सुरूच ठेवला. अपहरणातील आरोपींचा पाठलाग करीत नमूद पथकाने आरोपींना बार्शी तालुका पोलिस यांच्या सहकार्याने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी त्यांचे नाव नरसिंग ऊर्फ मुन्ना राजकुमार कांबळे, (वय 42 वर्षे, रा- नवीन रेणापूर नाका, साई रोड, आर्वी . लातूर), तुकाराम वामनराव साळुंके (वय 43 वर्षे, रा. नवरत्न नगर, आर्वी,लातूर), मंगेश नागनाथ वंजारे, (वय 38 वर्षे, रा. चिकलठाणा, लातूर),
शंकर अंगद कोयाळकर, (वय 34 वर्षे, रा. नवीन रेणापूर नाका, मारोती मंदीर समोर आर्वी,लातूर) असे असल्याचे सांगून त्यांच्यासोबत असलेल्या व अपहरण केलेल्या मुलास गुन्ह्यात वापरलेल्या टोयाटो कंपनीची कार एमएच 10 बीएम 4556, लोखंडी चाकू, काळया रंगाचे एयर पिस्टल सह ताब्यात घेवुन पोस्टे गांधी चौक येथे दाखल गुरनं. 691/2024 कलम 137(2),140 (1), 351(2), 351 (3), 3(5) भारतीय न्यायसंहिता 2023 गुन्हयात अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अतिशय शीघ्रगतीने कारवाई करत काही तासातच अपहरण गुन्ह्यातील आरोपींना एअरगन,लोखंडी चाकू, गुन्ह्यात वापरलेले वाहनसह ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वातील पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक आक्रम मोमीन, पोलीस अमलदार वाजिद चिखले, संपत कांदे, राजेंद्र टेकाळे, शिवाजी पाटील, संतोष गिरी, बाळू सारोळे, प्रकाश भोसले, राम गवारे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *