आधारस्तंभ बाप या संपादित ग्रंथास पुरस्कार जाहीर
उदगीर (प्रतिनिधी) : डॉ.नरसिंग कदम व बागडे नम्रता यांनी संपादित केलेल्या आधारस्तंभ बाप या ग्रंथास समृद्धी प्रकाशन हिंगोली येथील संत नामदेव संपादित ग्रंथ २०२४ चा पुरस्कार जाहीर झाला. तसे निवडीचे पत्र संयोजक श्रीराम कराळे यांच्याकडून प्राप्त झाले असल्याचे नरसिंग कदम यांनी सांगितले.या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील अनेक अभ्यासकांनी अभ्यासपूर्वक लेख लिहिलेले आहेत. डॉ नरसिंग कदम हे शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे प्रोफेसर आहेत. या पूर्वीही त्यांना अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आधारस्तंभ बाप या ग्रंथाच्या सुबक बांधणीचे काम तनिष्क पब्लिकेशन नाशिक यांनी केलेले आहे. मुखपृष्ठ सोमनाथ गायकवाड यांनी दिलेले आहे. या ग्रंथास पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार,नातलगाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.