चापोली डी सी सी बँकेत ” प्रिंटर” सेवा बंद !
चापोली (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चापोली येथील शाखे मध्ये शेतकरी, मजूर, नोकरदार यांना कर्मचाऱ्या तर्फे सर्व सुविधा उत्तम रीतीने पुरविल्या जातं आहेत.येथील डी सी सी शाखा सर्व प्रकारच्या सेवा उत्तम प्रकारे देत आहेत.अनेक गावाचा या बँकेशी संबंध असल्यामुळे नेहमीच गर्दी असते.डी सी सी बँक अद्यावत झाल्यामुळे ग्राहक राजा खुश आहे.पण बँकेत ऑटो मेटिक प्रिंटर सेंवा उपलब्ध नसल्यामुळे पास बुक प्रिंट करून मिळत नाही.त्या मुळे कुठली रक्कम जमा झाली?,कधी जमा झाली?,किती शिल्लक राहिली?किती काढता येयील? याबाबत नेहमी कर्मचारी सोबत विचारणा करत बसावे लागत आहे.दैनंदिन कार्य सोडून पुन्हा पुन्हा शिल्लक सांगायचे कार्य कर्मचाऱ्यास करावे लागत आहे.त्या करिता बराच वेळ ग्राहकास वीणा कारण वाट पाहत थांबावे लागत आहे.प्रिंटर ची सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वांची सोय होणार आहे.तरी डी सी सी चे सर्व प्रशासनास ग्राहकांनी विनंती केली आहे की,चापोली बँकेत पास बुक प्रिंटर ची वेगळी सुविधा उपलब्ध करून द्यावी.तसे सर्व सुविधा तत्परपने देण्यास बँक नेहमी सतर्क असते.त्यामुळे बँक पासबुक प्रिंटर चापोली डी सी सी मध्ये उपलब्ध करून ग्राहकाची लवकर सोय केली जाईल अशी अपेक्षा आहे.ग्राहकास सुविधा देण्यासाठी बँक नेहमीच पुढाकार घेत असते.ह्या ही वेळी प्रशासन ग्राहकाची विनंती पूर्ण करेलच अशी अपेक्षा ग्राहक वर्ग व्यक्त करतो आहे.