उदगीर रोटरीच्या वतीने मुलींच्या जन्माचे स्वागत
उदगीर (ता.प्र.) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त जागर स्त्री शक्तीचा उपक्रमातंर्गत सामान्य रुग्णालयातील जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. समाजात आज घडीला मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने मुलींच्या जन्माचे स्वागत आणि मातेचाही गौरव करून मुलींच्या जन्मासाठी प्रोत्साहन देण्याचे काम उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी उदगीर रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के, संतोष फुलारी, विजयकुमार पारसेवार, मंगला विश्वनाथे, डॉ. बस्वराज स्वामी व वैद्यकीय अधीक्षक पांडुरंग दोडके, डॉ. मेघश्याम कुलकर्णी, डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते. यावेळी सामान्य रुग्णालय व श्री रुग्णालयातील असे एकूण १६ नवजात मुलींचे बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या मातांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले.