सोन्या उर्फ अमित नाटकरे यास ग्रामीण पोलिसांनी अटक केली
उदगीर (प्रतिनिधी) : दोन खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप भोगत असलेला व पॅरालवर सुटलेल्या आरोपीने उदगीर येथे आपल्या पत्नीचा बंदुकीच्या गोळ्या घालून खून करून फरार झाला होता. त्यास उदगीर ग्रामीण पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर येथील दोन वेगवेगळ्या खुनाच्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सोन्या उर्फ अमित नाटकरे याने पॅरोलवर येऊन आपल्या पत्नीचा खून केला होता. खून केल्यानंतर तो लगेच फरार झाला होता.
या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेत कर्तबगार पोलीस पथकासह वेगवेगळ्या पथकांनी तपास करून त्यास पुणे येथून अटक केली आहे. यापूर्वीही या प्रकरणातील दोन आरोपींना संशयित म्हणून उदगीर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते.