अहमदपूर-चाकूर विधानसभेसाठी मनसेकडून डॉ नरसिंह भिकाणे यांना उमेदवारी

0
अहमदपूर-चाकूर विधानसभेसाठी मनसेकडून डॉ नरसिंह भिकाणे यांना उमेदवारी

अहमदपूर-चाकूर विधानसभेसाठी मनसेकडून डॉ नरसिंह भिकाणे यांना उमेदवारी

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर-चाकूर विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांची अधिकृत उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर केली.
अहमदपूर-चाकूर विधानसभा ताकदीने लढवण्याचा निर्धार करुन मागच्या पाच वर्षापासून मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी विविध जनआंदोलने करत व गावोगावी शाखाध्यक्ष नेमत जनसंपर्क वाढवला होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या राजकारणाला येथील जनता त्रस्त झाली होती. त्यांना एक उच्च शिक्षित व चळवळीतील चेहऱ्याची गरज होती. डॉ नरसिंह भिकाणे यांच्या माध्यमातून ती पुर्ण होईल अशी अपेक्षा येथील मतदार बोलून दाखवत होते. जनभावनेचा आदर करुन अहमदपूर-चाकूर विधानसभा लढवण्याचा निर्धार करुन डॉ भिकाणे यांनी गेली दोन महिने मतदारसंघ पालथा घातला आहे.त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. डॉ नरसिंह भिकाणे निवडणुकीच्या फडात उतरल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *