भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके विधानसभेच्या रिंगणात
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर-चाकूर तालुक्याच्या राजकारण व समाजकारणामध्ये सदैव अग्रेसर असणारे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अनेक वर्षापासून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती, अहमदपूर चाकूर भारतीय जनता पार्टी वर होत असलेला अन्याय व निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर, नेत्यावर आलेली वेळ पाहता कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या आग्रहास्तव भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी बालाघाट कॉलेज येथील सभेमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. यामुळे ओबीसी, दलित, अल्पसंख्याक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
गोरगरीब जनतेच्या अठरापगड जातीला सोबत घेऊन, तरुण कार्यकर्त्याच्या विश्वासावर, माय माऊली, वयोवृद्ध सर्वांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 29 ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी गणेश हाके यांनी सांगितले. त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून जोरदार गणेश हाके नावाचा जयघोष करण्यात आला व सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी गणेश हाके यांच्या विजयाचा गुलाल उधळण्याची शपथ घेतली.
यावेळी अशोक केंद्रे मा जि प सदस्य, बालाजी बेकरे, नाथराव केंद्रे , गजानन चंदेवाड, दयानंद वाघमारे, मन्नान शेख, चंद्रप्रकाश हांगे, तुकाराम फड, प्रफुल ढवळे, राजुरे मामा, भास्कर केंद्रे, रवी शिरसाट, जयश्री केंद्रे, पुष्पा तेलंग, अर्जुन गंगथडे, बबलू पठान, विजयकुमार देशपांडे, अर्चना कानडे, रघुनाथ गोरे, हेमंत गुट्टे, जब्बार पठाण, दत्ता कुलकर्णी, लक्ष्मणराव पोटे, बालाजी मुंडे, राजकुमार नरवटे, परमेश्वर पाटील, सर्व पत्रकार बांधव व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य रेखाताई तरडे यांनी मानले.