महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये किलबिलचा तेजस रणखांब राज्यात द्वितीय ..!!
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त असलेल्या ‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा’ 28 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल चा पाचवी वर्गातील विद्यार्थी तेजस मंगेश रणखांब याने या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरमसिंग शिराळे, कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप यांनी तेजस आणि त्याचे पालक यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..!!