तोगरी मोड येथील चेक पोस्टवर चार लाख 37 हजार जप्त
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे तोगरी मोड चेक पोस्टवर विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर स्थायी निगरानी पथकाने सरवाडी तालुका आळंदी येथून उदगीर कडे येणारी ईरटीका कारची झडती घेतली असता कार मध्ये चार लाख 37 हजार रुपये मिळून आले. याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील तोगरी – हैदराबाद मार्गावरील तोगरी मोड चेक पोस्टवर विधानसभा निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर स्थायी निगराणी पथक क्रमांक तीन यांनी सरवाडी तालुका आळंदी येथून उदगीर कडे येणारी इरटीका कार (क्रमांक के ए 68 एम 2107) त्याची तपासणी करताना पथकाला चार लाख 37 हजार रुपयांची रोकड मिळून आली. यावेळी कार मध्ये कांताप्पा खंडोपा बयोमनी व रामचंद्र माननीय गुत्तेदार (दोघेही रा. कमाल नगर) यांनी या पैशाच्या संदर्भात समाधानकारक माहिती न दिल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली. पथकातील पथक प्रमुख एम पी बेल्हाळे, ये के देवनाळे, यु के राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, एस पी बडे आदींनी सदर प्रकरणी कर्तव्य बजावले.