उदगीरच्या विकासासाठी ना. संजय बनसोडे यांना निवडून द्या – राजेश्वर निटुरे
उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या पाच वर्षात उदगीर मतदारसंघाचा कायापालट करणारे ना. संजय बनसोडे हे या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना आपण सर्वांनी उदगीरच्या विकासासाठी निवडून द्या, असे मत माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केले.
येथील कौळखेड रोड वरील शिवम फंक्शन हाॅल येथे ना.संजय बनसोडे यांची महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांची व पदाधिका-यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी राजेश्वर निटुरे बोलत होते.
माजी जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, चंद्रकांत वैजापुरे, शिवसेनेचे नेते अॅड. गुलाब पटवारी, रामराव बिरादार येणकीकर, जळकोटच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, रमेश अंबरखाने, शिवानंद हैबतपुरे, अॅड. ब्रह्माजी केंद्रे,रामराव राठोड, समीर शेख, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शिवसेनेचे विकास जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मनोज चिखले, विठ्ठल जाधव, श्याम डावळे, प्रवीण भोळे, अर्जुन आगलावे, संग्राम हासुळे पाटील, बाळासाहेब पाटोदे, बापूराव यलमटे, रुपेंद्र चव्हाण, अनिल मुदाळे, गिरीश उप्परबावडे, यांच्यासह महायुतीतील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.