आजपर्यंत अहमदपूर-चाकूर विधानसभा उमेदवारीचे 18 अर्ज दाखल

0
आजपर्यंत अहमदपूर-चाकूर विधानसभा उमेदवारीचे 18 अर्ज दाखल

आजपर्यंत अहमदपूर-चाकूर विधानसभा उमेदवारीचे 18 अर्ज दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : आजपर्यंत अहमदपूर-चाकूर विधानसभा उमेदवारीचे 18 अजर्र् दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि.22) पासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन दि. 23 ऑक्टोबर 2024 रोजी एक उमेदवारानी अर्ज दाखल केला होता. तर 24 ऑक्टोबर 2024 रोजी 09 अर्ज दाखल झाले होते तर आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी 03 अर्ज दाखल झाले असुन आजपर्यंत उमेदवारांचे 18 नामनिदेर्शन फॉर्म दाखल झाले आहेत.
दि 22 ऑक्टोबर 2024 रोजी 1. वागलगावे रावसाहेब निवृत्तीराव रा. राचन्नावाडी ता चाकुर पक्ष अपक्ष 2.जाधव विनायक सोनबा रा. सावरगाव रोकडा ता अहमदपूर पक्ष राष्ट्रीय मराठा पार्टी जात मातंग 3. जाधव गणेश दौलतराव रा तेलगाव ता अहमदपूर पक्ष अपक्ष 4. माधव रंगनाथ जाधव रा खंडाळी ता. अहमदपूर पक्ष अपक्ष 5. तिडोळे बालाजी लिंबाजी रा हासर्णी ता अहमदपूर पक्ष अपक्ष आदी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय अहमदपूर येथे दाखल केले असुन आजपर्यंत एकुण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी वागलगावे रावसाहेब निवृत्‍तीराव -बहुजन विकास आघाडी यांचा एक अर्ज दाखल झाला होता.
दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी बाबासाहेब मोहनराव पाटील, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, माधव रंगनाथ जाधव-अपक्ष, जाधव पाटील विनायकराव किशनराव-नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, जाधव पाटील विनायकराव किशनराव – अपक्ष, अबोली विनायकराव जाधव पाटील – अपक्ष, अबोली विनायकराव जाधव पाटील – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, चंद्रशेखर चंद्रभान तांदळे – अपक्ष, बब्रुवान रामकृष्ण खंदाडे- अपक्ष, अविनाश बाळासाहेब जाधव – अपक्ष एकुण 09 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत. असे एकुण आजतागायत पर्यंत 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.सदरील निवडुक कार्य अत्यंत चोखपणे निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार सहा. निवडणुक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर, नरसिंग जाधव तसेच नियुक्‍त कर्मचारी यांच्या वतीने केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *