अहमदपूर येथील मेन रोड वरील सभेला परवाणगी देऊ नये व्यापार्यांची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरातील मेन रोड बाजार पेठ आणि सराफ लाईन अहमदपूर येथे कोणत्याही सभेला परवानगी देवू नये असे निवेदन व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, अहमदपूर येथील मेन रोड बाजार पेठ आणि सराफ लाईन अहमदपूर येथील सर्व व्यापारी बांधव अर्ज करत आहोत की, येणार्या काळात दिवाळी सणामुळे बाजार पेठेत ग्राहाकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, मुख्य बाजारपेठेत कोणत्याही सभेला परवाणगी देण्यात येऊ नये. कारण सभेमुळे बाजारपेठत व्यापारावर आणि रहदारीवर त्या दिवशी फार मोठा परिणाम होतो व त्यामुळे आमच्या व्यापारावर याचा परिणाम होत आहे.
तरी सदरील होणारी व्यापार्यांची अडचण लक्षात घेता कोणत्याही सभेला परवाणगी देण्यात येऊ नये असे निवेदन तहसीलदार, तहसील कार्यालय, अहमदपूर यांच्या मार्फत उप जिल्हाअधिकारी, अहमदपूर, मुख्य अधिकारी नगर परिषद, अहमदपूर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर बालाजी पाटील गलाले, जय भुतडा, पुरुषोत्तम बाहेती , अभि करकनाळे, विक्की सोनी, तानाजी शिंदे, रोहित धडे आदिंसह असंख्य व्यापारी महासंघाचे सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.